Uncategorized
Trending

Nallasopara Crime News : घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक गुन्हे शाखा, कक्ष-3 विरार यांची कामगीरी

दरवाज्याची भिंत फोडून चोरटे घरात प्रवेश

नालासोपारा :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यापासुन घरफोडीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपी यांचा शोध घेवुन पायबंद करणे बाबत सुचना दिल्या होत्या. Nallasopara Crime News

05 मार्च 2024 रोजी रात्री 2.30 वाजताच्या दरम्यान ते रात्री 4.00 वाजताच्या दरम्यान फिर्यादी (26 वर्षे), रा. संतोषभवन, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर यांचे राहते घरातील लोखंडी दरवाजाची कडींचे बाजुची भिंत फोडुन दरवाजा उघडून त्यावाटे घरात प्रवेश करुन फिर्यादी याचे राहते घरातुन वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले म्हणून पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर भा.द.वी.स. कलम 380,457 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. Nallasopara Crime News

गुन्हे अनुषंगाने पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सि.सि.टी.व्ही. फुटेज मध्ये संशयीत आरोपीत निष्पन्न करुन तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन आरोपी नामे जाकीर सिराज शेख, (रा. मौर्या चाळ, रुम नंबर 20 शेरु खानच्या बंगल्यासमोर ) श्रीराम नगर, नालासोपारा पूर्व, यास 05 मार्च रोजी 30 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडे प्राथमिक तपास करता त्यांचा खालील गुन्हयात नमुद आरोपी यास पुढील कारवाई करीता पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा भा.द.वी. से कलम 457,380 या गुन्हयात हजर करण्यात आले आहे. Nallasopara Crime News

पोलीस पथक
अविनाश अंबुरे Avinash Ambure, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, आतिश पवार, मनोहर तारहे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष ३ तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेम, सायबर सेल यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. Nallasopara Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0