मुंबईठाणे

PM Modi : पंतप्रधान मोदी उद्या नवी मुंबईत; पीएसए टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे करणार उद्घाटन

PM Modi Visit Navi Mumbai Airport : सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांचीही उपस्थिती; मोदींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष,

नवी मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi उद्या, ४ सप्टेंबर रोजी नवी मुंबईच्या Navi Mumbai दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी प्रशासनासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथील पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रम काय?

केंद्र सरकारच्या बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमाला सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, खासदार अप्पा बारणे आणि आमदार महेश बालदी हे देखील उपस्थित असतील.

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी सर्वत्र तपासणी सुरू केली असून, शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

जेएन पोर्ट टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे भारताच्या सागरी व्यापाराला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0