Nalasopara Crime News : तुळीज पोलिसांची कामगिरी हरविलेले पंचवीस फोन परत करण्यास पोलिसांना यश

Nalasopara Crime News : तुळींज पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी ; 01 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन तुळींज पोलीस ठाणे मोबाईल फोन मिसींग मधील एकुण 2 लाख 50 हजार रूपये किंमतीचे 25 मोबाईल फोन तक्रारदार यांना परत

नालासोपारा :- तुळींज पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचे तसेच गर्दीचे ठिकाणे असुन, दैनंदिन कामाचे घाईगडबडीमध्ये रेल्वे स्टेशन परिसर तसेच सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी आठवडा बाजार येथे लोकांचे मोबाईल फोन हरविलेले पोलीस ठाणे तसेच ऑनलाईन तक्रारी प्राप्त होत असतात. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तुळींज पोलीस ठाणेत दाखल प्रॉपर्टी मिसींगमधील गहाळ मोबाईल यांचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन, 01 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन, पोलीस ठाण्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून प्रॉपर्टी मिसींग मधील विविध कंपन्यांचे एकूण 2 लाख 50 हजार रूपये किंमतीचे एकुण 25 मोबाईल तक्रारदार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते परत दिले आहेत. तक्रारदार यांनी त्यांचा हरविलेले मोबईल फोन परत मिळाल्याने समाधान व्यक्त करून, पोलीसांचे कामगिरीचे कौतुक केले आहे. Mumbai Crime News
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रींगी पोलीस उप आयुक्त , परीमंडळ-2 वसई, उमेश माने-पाटिल सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेंद्र नगरकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, पोलीस हवालदार आनंद मोरे, पोलीस हवालदार उमेश वरठा, पोलीस हवालदार आशपाक जमादार, पोलीस हवालदार पांडुरंग केंद्रे, पोलीस शिपाई छपरीबन, शशिकांत पोटे, राहुल कदम तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ -02 नेमणुकीतील पोलीस हवालदार बागुल, पोलीस शिपाई अमोल बर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Mumbai Crime News