क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Crime News : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक ; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला केले अटक

Mumbai Online Marriage Scam News : Online माध्यामाद्वारे महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, विश्वास संपादन करून, फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार इमारानअली फैनअली खान यास जेरबंद .

मुंबई :- महिलेला लग्नाच्या आमिष दाखवून Marriage Fraud फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद केले असून आरोपीने महिले कडून लाखो पैसे उकळले होते.मे 2023 ते आक्टोंबर 2023 या कालावधीत आरोपी इमानअली फैजअली खान,( रा.ठि. हैद्राबाद, आंध्रप्रदेश) याने फिर्यादी महिला यांना Online माध्यमाव्दवारे संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवुन विश्वास संपादन केला. तसेच खोटी कारणे सांगून वेळोवेळी पैशाची मागणी करुन 21 लाख 76 हजार 502 रुपये रोख पेटीएम एन.ई.एफ.टी या माध्यमातून घेतले व ते फिर्यादी यांना परत केले नाहीत. याप्रकारे आर्थिक व मानसिक फसवणुक केलेबाबत फिर्यादी यांनी तकार केल्यामुळे पायधुनी पोलीस ठाणे येथे आरोपी इमानअली फैजअली खान विरूध्द कलम 406,420 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. Mumbai Crime News

गुन्हयातील आरोपी व्यक्ती हा वारंवार त्याचे राहते ठिकाण बदलत असल्याने व तो पोलीसांचे लक्ष विचलित करीत असल्याने तो मिळून येत नव्हता. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पायधुनी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हयाचा तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण करून त्या आधारे सखोल तपास करून आरोपीच्या वास्तव्याबाबत (लोकेशन) उचित माहिती प्राप्त करून आरोपीस हैद्राबाद येथून शियापीने ताब्यात घेतले. Mumbai Crime News

आरोपी इमानअली फैजअली खान याच्या सखोल चौकशी मध्ये त्याचा दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. चौकशीमध्ये आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे व त्याच्या विरुध्द भारतामध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. Mumbai Crime News

अटक आरोपीताचा गुन्हे अभिलेख खालील प्रमाणे

1) चंचलगुडा पोलीस ठाणे, हैद्राबाद कलम147,324,427,382 भादवि.

2) चंचलगुडा पोलीस ठाणे, हैद्राबाद गुरख्क्र ३६६/२००८ कलम 147,149,302,324,324,427,153 (अ) भादवि

3) दाबेरपुरा पोलीस ठाणे हैद्राबाद कलम 3,4 ए. पी जुगार कायदा

४) दाबेरपुरा पोलीस ठाणे हैद्राबाद कलम 3,4 ए.पी जुगार कायदा

5) दाबेरपुरा पो ठाणे गुरक्र ५६/२०१२ कलम 376,354,506,109,120 (ब), 34 भादवि

6) दाबेरपुरा पोलीस ठाणे हैद्राबाद कलम 307,34 भादवि

7) दाबेरपुरा पोलीस ठाणे हैद्राबाद कलम 307,34 भादवि
8) दाबेरपुरा पोलीस ठाणे हैद्राबाद कलम 342,384,34 भादवि

अटक आरोपी हा खालील नमुद गुन्हयामध्ये मुख्य आरोपी असल्याचे दिसून आले

1) गंगाखेड पोलीस ठाणे, परभणी, महाराष्ट्र कलम 498 (अ) भादवि
2) गंगाखेड पोलीस ठाणे, परभणी, महाराष्ट्र कलम 420,406,34 भादवि

पोलीस पथक

अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 2 डॉ मोहितकुमार गर्ग,सहाय्यक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग, ज्योत्सना रासम यांच्या मार्गदशनाखाली पायधुनी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळकृष्ण देशमुख , पोलीस निरीक्षक नितीन पगार (गुन्हे), पोलीस उप निरीक्षक अनिल वायाळ, पोलीस हवालदार कैलास भोईटे, इरफान खान, दिपक निकम व परब (व्ही.पी रोड पोलीस ठाणे) तसेच पोलीस शिपाई शंकर राठोड, नितेश घोडे, प्रकाश अलदर व विलास पाडवी यांनी केली आहे.

नागरिकांना मुंबई पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते

अशा प्रकारे कोणी online cyber माध्यमाद्वारे संपर्क केल्यास त्याबाबत योग्य पडताळणी करावी व त्याद्वारे फसवणुक होणार नाही याची दक्षता घ्यावी व असा प्रकार निदर्शनास येताच त्वरीत मुंबई पोलीसांशी संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0