Pune Crime News : अपहत मुलाची कर्नाटक येथून सूटका : पुणे पोलिसांची दबंग कामगिरी
Pune Police Breaking News : अपहत बालकांच कौशल्यपूर्ण शोध घेणाऱ्या बंड गार्डन तपास पथकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांच्याकडून लाख रुपयांचे बक्षिस
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रोत्साहनामुळे पुणे पोलिसामध्ये नवचैतन्य !
पुणे :- 6 महिने वयाच्या बालकाचे अपहरण Kidnapping करून विक्री करणारे टोळीला विजापुर राज्य कर्नाटक येथुन जेरंबद व अपहरण झालेल्या बालकाची सुटका पोलिसांना Pune Police या यश आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे.दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी पुणे रेल्वे स्टेशन, समोरिल मोकळ्या जागेत आई सोबत झोपलेल्या 6 महिने वयाचे बालकाला पाहटे 02.00 वाजताचे सुमारास अनोळखी इसमाने उचलुन अपहरण करून चोरी केल्याचे मुलाचे नातेवाईक वडील यांनी 04.00 वाजताचे सुमारास फिर्यादी (34 वर्षे) (रा. यवतमाळ) यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे Bundgarden Police Station भादंवि कलम 363,370,34 प्रमाणे गुन्हा नोदं करणेत आला. Pune Crime News
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरील 3 टीम तयार करून परिसरातील 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता एका ठिकाणी संशयीत इसम मुलास उचलुन घेवून जाताना अस्पष्टपणे दिसुन आले. त्यानंतर पुन्हा बारकाईने पाहिले असता सदरचा संशयीत इसम हा पुणे स्टेशन परिसरातुन कोणत्या मार्गाने गेला हे दिसुन आले नाही त्यामुळे सदर गुन्हयामध्ये चारचाकी व्यहनाचा वापर झाला असावा तसेच गुन्हयात आरोपी 1 पेक्षा जास्त असल्याचा संशय बळविल्याने सदरबाबत तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयातील आरोपी हे चारचाकी गाडीने पुणे स्टेशन येथुन विजापुर राज्य कर्नाटक येथे गेल्याचे निष्पन्न झाले. Pune Crime News
त्यानंतर गुन्हयाचे अनुषंगाने बंडगार्डन पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि रविंद्र गावडे व टीम वीजापुर राज्य कर्नाटक येथे तत्काळ रवाना करून सदर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकुन इसम नामे चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंड्डी (24 वर्षे) (रा. जंबगी ता. जि. वीजापुर) यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले त्याचेकडे कौशल्या पुर्ण तपास केला असता त्याने सदरचे बालक हे त्याचे इतर 4 साथीदार यांचे मदतीने अपहरण करून त्यांचेडील इंडिका कार मधुन वीजापुर येथे नेवून इसम नामे सुभाष सताप्पा कांबळे (55 वर्षे) (रा. लांवगी सोलापुर) यांना 3 लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितल्याने सदरील पोलीस पथकाने विजापुर शहर येथे वेगवेगळया हॉटेलमध्ये पाहणी केली असता हॉटेल राजधानी, गांधी चौक वीजापुर येथे अपहरण झालेले बालक व आरोपी सुभाष कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. Pune Crime News
उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षिस देवुन टिमचा गौरव केला आहे.
पोलीस पथक
अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2. पुणे शहर स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, संजय सुर्वे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबांळकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ‘सदिप मधाले, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांचे पथकाने केली.