Nagpur Fire News : नागपुरात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, दोघांचा मृत्यू, बचावकार्य संपले

Nagpur Latest Crime News : नागपूरच्या फटाका कारखान्यात रविवारी स्फोट झाला. स्फोटानंतर आग लागली. बचाव कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली आणि जखमींना बाहेर काढले.
नागपूर :- नागपुरात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रविवारी दुपारी 1.30 वाजता स्फोटाची घटना घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने स्फोटानंतर पसरलेली आग आटोक्यात आणली असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
काटोल तहसीलमध्ये असलेल्या एशियन फायरवर्क्समध्ये हा स्फोट झाला, काटोल तहसील नागपूर जिल्हा मुख्यालयापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी कारखान्यात 31 कामगार काम करत होते. एसपी हर्ष ए पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.हर्ष पोद्दार म्हणाले, फॉरेन्सिक तपासणीनंतरच स्फोटाचे कारण कळेल. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि स्फोटक विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले.सुरुवातीला काही कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळाली होती. याआधी जानेवारी महिन्यात भंडारा येथील जवाहरनगर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट होऊन आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.