मुंबई : परिमंडळ-7 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 सराईत गुन्हेगार 1 व 2 वर्षासाठी तडीपार

Mumbai Latest Tadipar News : परिमंडळ-7 पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांनी तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.
मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ-7 Mumbai Crime Unit 7 कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या 7 सराईत गुन्हेगारांना 1 व 2 वर्षासाठी तडीपार केले आहे.पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांनी तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे. Mumbai Latest Tadipar News
परिमंडळ-7 कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. या सराईत आरोपींवर कायद्याचा जरब व धाक निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघातक घटना टाळण्यासाठी परिमंडळ-7 पोलिस उपायुक्तांकडून सर्व पोलीस ठाण्यात वास्तव्यात असलेले व गुन्ह्यात सक्रिय, उपद्रवी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई सुरू केली आहे.

कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपींना तडीपार केले
1.पंतनगर पोलीस ठाणे हद्दीतील गिरीष गंगाराम शिंदे, (वय 25)
2.पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील शाहुल हमीद उमर सव्यद उर्फ शाहु, (वय 37)
3.भांडुप पोलीस ठाणे हद्दीतील अशोक गीतम गायकवाड उर्फ दादया, (वय 33)
4.मुलुंड पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मण शंकर पवार, (वय 32)
5.मुलुंड पोलीस ठाणे हद्दीतील जितु दिनेश शर्मा, (वय 26)
6.कांजुरमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील लखन लल्लुराम गौड, (वय 24)
7.मुलुंड पोलीस ठाणे हद्दीतील वैभव सचिन खताळ, (वय 27)