मुंबई
Trending

Mumbai Traffic Update : “या” कामामुळे मुंबईतील काही रस्ते बंद

•पोलीस उप आयुक्त समाधान पवार यांनी, पर्यायी मार्ग वापरण्याचे दिले निर्देश

मुंबई :- उप मुख्य अभियंता (सांडपाणी नियमन) नियोजन व बांधकाम, प्रशासकीय इमारत, सेनापती बापट रोड, दादर (पश्चिम),यांना माटुंगा वाहतूक विभाग ह‌द्दीतील लक्ष्मी नप्पु रोड वरी वेलींगकर कॉलेज ते भंडारकर रोड ते भाऊदाजी रोड पर्यंत 1725 मिटर अंतराचे सांडपाणी लाईन टाकण्याचे काम करावयाचे आहे. कामादरम्यान जनतेला वाहतूकी संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेवून सदर मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात स्वरूपात वळविण्यासाठी योग्य ते आदेश जारी करणे आवश्यक वाटते. जनतेस होणारा अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या कारणाकरीता आणि तसा निर्देश समाधान पवार, पोलीस उप-आयुक्त, अतिरिक्त मुख्यालय व मध्य विभाग, वाहतूक, मुंबई आलेल्या अधिकाराचा वापर करुन याद्वारे आदेश देत आहे.वाहतुक व्यवस्थेमध्ये 3 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत या मार्गांमध्ये बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. Mumbai Traffic Update

सेनापती बापट रोड, दादर (पश्चिम),यांना माटुंगा वाहतूक विभाग ह‌द्दीतील लक्ष्मी नप्पु रोड वरी वेलींगकर कॉलेज ते भंडारकर रोड ते भाऊदाजी रोड पर्यंत 1725 मिटर अंतराचे सांडपाणी लाईन

वाहतुकीस एक दिशा मार्ग

तेलंग रोड हा सी.जी. रामन चौक ते श्री. माटुंगा गुजराती सेवा मंडळ चौक पर्यंत वाहतूकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

तेलंग रोडवर श्री माटुंगा गुजराती सेवा मंडळ चौक कडून सी.जी. रामन चौककडे जाणारी वाहतूक भांडारकर रोडवरून सरळ महेश्वरी उद्यान सर्कल येथुन डावे वळण घेवून पुढे भाऊदाजी रोड ने पुढे इच्छित स्थळी जातील.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, हेमंत मांजरेकर रोड ते प्रतिक्षानगर (मराठा हॉटेल पर्यंत) पर्यंत २६० मीटर अंतराचे सांडपाणी पाईप लाईन टाकण्याचे काम Mumbai Traffic Update

वाहतुकीस मार्ग बंद

छत्रपती शिवाजी महाराज चौक, हेमंत मांजरेकर रोड ते प्रतिक्षानगर (मराठा हॉटेल पर्यंत) पर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

जी.टी. बी. नगर रेल्वे स्थानक कडून जयशंकर याज्ञिक मागनि प्रतिक्षा नगर कडे जाणारी वाहतूक हि हेमंत मांजरेकर मागनि डावे वळण घेवून, जी. टी. बी. मोनो रेल स्थानकाखालून पूढे वडाळा डेपो मोनो रेल स्थानक ते रुणवाल पार्क येथे डावे वळण घेवून पुढे इच्छित स्थळी जातील.

प्रतिक्षानगर कडून जी.टी.बी. नगर रेल्वे स्थानक कडे जाणारी वाहतूक रुणवाल पार्क येथे उजवे वळण। घेवून पूढे वडाळा डेपो मोनो रेल स्थानक ते जी.टी.बी. मोनो रेल ते मुकुंदराव आंबेडर मागनि स्वर्ण बिंद्रा कौर चौक येथे उजवे वळण घेवून पुढे इच्छित स्थळी जातील. Mumbai Traffic Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0