मुंबईसामाजिक

Devendra Fadnavis and Vishwajeet Kadam Viral Video : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल, काय घडलं?

•देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यात विधिमंडळाबाहेर झालेल्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई :- विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच म्हणजेच शुक्रवारी संपले. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विकासकामांच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाली. ही चर्चा एका सिंचन प्रकल्पाबाबत असल्याचे समजते.Devendra Fadnavis and Vishwajeet Kadam Viral Video

राज्य विधिमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संपले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज आटोपून विधिमंडळ परिसरातून बाहेर पडत होते. नेहमीप्रमाणे त्यांना भाजप आमदारांच्या गटाने घेराव घातला. हे आमदार फडणवीस यांच्याशी बोलत होते.त्याचवेळी पाठीमागून जमाव कापत विश्वजीत पुढे आला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फडणवीस घाईत होते आणि चालत राहिले. तेव्हा विश्वजीत कदम पटकन त्यांच्याजवळ आले आणि बोलू लागले. या दोघांमध्ये काही संवाद झाला. त्यावेळी फडणवीसांच्या एका वाक्याने विश्वजीत कदम यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. काही वेळाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू राहिली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले. Devendra Fadnavis and Vishwajeet Kadam Viral Video

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0