Mumbai Rain : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा बैठक
Mumbai Rain Updates : मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत, मुख्यमंत्री यांनी घराबाहेर न पडण्याच्या केले होते आवाहन
मुंबई :- काल मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस Mumbai Rain झाला या सात तासाच्या कालावधीत मुंबईत जवळपास 300 mm पाऊस झाला त्यामुळे मुंबई पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचून अनेक ठिकाणी पाण्याचा निचराही केला जात आहे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर महामार्गांवर वाहनांच्या मोठ्याच रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. महाविद्यालय आणि शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन कक्षात आडवा बैठक घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. पुढील काही तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Mumbai Rain Updates
मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेला अलर्ट
मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मनपा कर्मचाऱ्यांनी देखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याबाबत निर्देश दिले.यावेळी पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत त्यांची माहिती घेतली, वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावे, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी असेही सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करावे असेही निर्देश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. Mumbai Rain Updates
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी उपस्थित होते. Mumbai Rain Updates