Mumbai Railway Mega Block : रेल्वेचा मेगाब्लॉक..!! रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनो रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचा वेळापत्रक जाणून घ्या
•Mumbai Railway Mega Block मुंबईचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्ती देखभाल साठी रेल्वेचा मेगाब्लॉक
मुंबई :- मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुंबईमध्ये रविवार, 16 जून, 2024 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील मध्य, आणि हार्बर मार्गावर परिणाम होणार आहे. माटुंगा ते मुलुंड या (लोकल) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर 10:05 ते 15:05 या वेळेत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. Mumbai Railway Mega Block
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत मांटुगा ते मुलूंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकलसेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचतील. Mumbai Railway Mega Block
हार्बर मार्ग
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे / गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. Mumbai Railway Mega Block