Mumbai Police News : तक्रार निवारण दिवस…..!!!
•मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून हप्त्याच्या दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून अनेक तक्रारीचे निवारण होते.
मुंबई :– मुंबई पोलीस आयुक्तालयांने यांच्या हद्दीत येणाऱ्या मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये दर शनिवारी नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जातो. या कार्यक्रमात सर्व पोलीस ठाण्यामधील महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या तक्रार चे निवारण पोलिसांकडून केले जाते. तक्रार निवारण दिनाच्यावेळी सर्व पोलीस ठाणे मिळून 1197 तक्रारदार या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये 555 महिला तक्रारदार आणि 114 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये न्याय मिळेल या अपेक्षा ने एक वातावर आनंदाचे वातावरण होते. पोलिसांचा हा उपक्रम जनतेला न्याय मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. मुंबई पोलीस आयुक्त इतर अधिकारी वर्ग यांनी चालू केलेल्या कार्यक्रमाबाबत सर्व क्षेत्राकडून कौतुक केले जाते.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई व विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशान्वये व पोलीस सह आयुक्त (का. व सु.), मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. आज 25 मे रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला व जेष्ठ नागरीक यांच्याकरीता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.