महाराष्ट्र

Uran News : ‘ग्रँड उरण सेंट्रल’मुळे जणूकाही मुंबईच उरणला आली आहे – महेश बालदी

‘अल्टो फिन’चा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट उरण शहराचा चेहरा मोहरा बदलणार

विकासक रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे यांचे स्वप्नातील ‘ग्रँड उरण सेंट्रल’ प्रत्यक्षात येणार

उरण : उरणचा चेहरामोहरा बदलवून टाकणारा ‘ग्रँड उरण सेंट्रल’ हा प्रोजेक्ट उरणमध्ये उभा राहत आहे. या रेरा अप्रोव्हड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफ स्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला ‘ग्रँड उरण सेंट्रल’ विविध सोयीसुविधांनी उपयुक्त असा आहे. ‘अल्टो फिन’ ही नवी मुंबईतील विकासकांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापालट करणारा प्रीमियम कमर्शिअल प्रोजेक्ट उभारतेय.

उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेले हे सर्वांग सुंदर असे स्वप्नातील ‘ग्रँड उरण सेंट्रल’ आता प्रत्यक्षात उभे राहणार आहे. सहज परवडेल असा पण अत्यंत सुंदर असं मॉर्डन इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरचं काही… हा प्रोजेक्ट फक्त कमर्शिअल नसून रेसिडेंसिअल सुद्धा असणार आहे. या प्रोजेक्टचा लाँच सोहळा उरणमध्ये अगदी थाटात संपन्न झाला. उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्वपक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ‘ग्रँड उरण सेंट्रल’ प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि रेश्मा शिंदे यांनी या कार्यक्रमाला चारचाँद लावले.
दरम्यान, थाटात संपन्न झालेल्या प्रोजेक्ट लाँच सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये ‘ग्रँड उरण सेंट्रल’ सारखा भव्यदिव्य प्रोजेक्ट उभा राहत असल्याने समाधान व्यक्त केले. जणूकाही मुंबईच उरणला आली आहे, अशा शब्दात त्यांनी प्रोजेक्टचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0