Mumbai Crime News : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई 04 ठिकाणी छापे ; कोट्यावधी किंमतीची अंमली पदार्थ जप्त
Mumbai Crime News Mumbai Police Arrested Drug Peddler : आंतरराज्यीय हेरॉईन ड्रग्ज तस्करांसह 07 ड्रग्ज तस्करांना अटक करून 1 कोटी 36 लाख रूपये किंमतीचे हेरॉईन व एम.डी. ड्रग्ज जप्त.
मुंबई :- अमली पदार्थाचे तस्करी Drug Peddler आणि विक्री Drug Seller करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी चांगलाच बडगा उगारला आहे. देशात आणि राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जारी झाले आहे. काल पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडले आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Mumbai Police पोलीस यंत्रणा सज्ज झाले असून शहरात कायदा व सुव्यवस्था शांतता राहावे तसेच बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशातच पोलिसांनी अमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उभारला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने चार ठिकाणी छापेमारी करत कोट्यावधीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. Mumbai Crime News
मालाड पश्चिम, मुंबई व वसई विरार परिसरातून 310 ग्रॅम हेरॉईन जप्त.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिटचे Kandivali Police Unit पथकाने दिनांक 19 एप्रिल रोजी मालाड पश्चिम, मुंबई तसेच वसई विरोर या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत एकूण 4 व्यक्तींना अटक केले. त्यांचे ताब्यातून 310 ग्रॅम वजनाचा हेरॉईन एकुण किं. अं. रुपये 1 कोटी 24 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपीस न्यायालया समक्ष रिमांडकामी हजर करीत आहे. नमूद गुन्हयाचा पुढील तपास कांदिवली युनिटचे पोलीस उपनिरीक्षक निखिल शेळके हे करत आहे. Mumbai Crime News
कुर्ला पश्चिम, मुंबई परिसरातून 60 ग्रॅम एम.डी. जप्त
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरळी युनिटचे पथकाने दिनांक 20 एप्रिल रोजी कुर्ला पश्चिम, मुंबई या परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत एकूण तीन व्यक्तीना अटक केले. त्यांचे ताब्यातून 60 ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रॉन’ एकूण किं. अं. रुपये 12 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपीस न्यायालया समक्ष रिमांडकामी हजर करीत आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरळी युनिटचे पोलीस Worli Police Unit उपनिरीक्षक अमित घोगरे हे करत आहे. Mumbai Crime News
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन 2024 मध्ये एकूण 24 गुन्हे दाखल करून त्यामध्ये एकूण 62 आरोपींना अटक करत त्यांचे ताब्यातून एकूण 34.5 किलो पेक्षा अधिक वजनाचे विविध अंमली पदार्थ व 1200 कोडेन मिश्रीत कफ सिरप बॉटल्स असा एकूण अं. किं. रूपये 31.64 कोटी पेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केला आहे.सन 2024 मध्ये हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्तीचेएकूण 3 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 8 आरोपींनाअटक केले असून, त्यांचे ताब्यातून एकूण 1 किलो 138 ग्रॅम वजनाचा किं. अं. रूपये 4.22 कोटी किंमतीचा हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्तीचे एकूण 16 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 46 आरोपींना अटक केले असून, त्यांचे ताब्यातून एकूण 11.5 किलो पेक्षा अधिक वजनाचा किं.अं. रूपये 22.92 कोटी किंमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar) , बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, व राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथक कक्ष, गुन्हे शाखा, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ व वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.