Ashish Shelar Tweet : शिवसैनिकच सोबत नाही तर नवे प्रचार गीत ऐकणार…. भाजप नेते आशिष शेलार यांचे ट्विट
•भारतीय जनता पार्टीचे नेते च्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला
मुंबई :- भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधतात काव्यात्मक ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रमाणे खासदार संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधतात त्यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्याकडून एक काव्यात्मक रुपी ट्विट पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. सर्जेराव माध्यमांचे संवाद साधताना भाजपावर जोरदार निशाणा साधला जात आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांच्या ट्विट
हे तर युटर्न फेम ज्यांच्या भूमिका सदैव दोन….शिवसैनिकच सोबत नाही तर नवे प्रचार गीत ऐकणार तरी कोण?…नव्याने कितीही शंख नाद करा आणि दाखवा जूनी चित्रफीत….भरकटलेल्या जहाजालाकशी दिशा दाखवेल नवे प्रचार गीत?….जोश दिसतो “आम्ही शिवाचे सैनिक वेडे..” हेच गीत म्हणताना…
नव्या गीतात भासतात पत्रकार पोपटला “तुतारी फुंकताना!”