क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Crime News : गुन्हे शाखेअंतर्गत सायबर पोलीस ठाण्याने Man In the Middle Attack फसवणुकीतील वाचवले 82.55 लाख रूपये

Mumbai Crime News Mumbai Police Arrested Cyber Crime Criminal : नामांकित इंटरनॅशनल स्कुलने कॅफेटेरियाचे नावाने फसवणूक

मुंबई :- (23 फेब्रुवारी 2024 ते 16 मार्च 2024 रोजी दरम्यान) एका नामांकित इंटरनॅशनल स्कुलने कॅफेटेरियाचे बांधकामात्चे साहीत्य पुरवठा करण्यासाठी UAE मधील Euro phone Acoustics या कंपनीशी करार पक्का केला असता त्या कंपनीने त्यांच्या अधिकृत ई-मेल आय.डी वरून कंपनीचे UAE मथील बँक डिटेल्स व्यवहाराकरिता दिले होते. परंतु कोणीतरी अज्ञात इसमाने त्या मेल आय डी सारखा दिसणारा बनावट ईमेल आयडी तयार करून, त्या मेल आय डी वरून इंटरनॅशनल स्कुलला मेल करून नविन USA मधील बँक डिटेल्स स्कुलला पाठविले व सदर स्कुलथी एकुण रूपये 87 लाख 26 हजार 995.65 ची आर्थिक फसवणुक केली म्हणून मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथे कलम 419,420,465,467,468,471,34भादंविसह कलम 66 ड माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. Mumbai Cyber Crime

सदर गुन्हयात मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ तांत्रिक व पारंपारिक तपासाची कार्यवाही करून संबधित नोडल बँक अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करून सदर फसवणुकीच्या रक्कमेपैकी एकुण रूपये 82 लाख 55 हजार 955 एवढी रक्कम इंटरनॅशनल स्कुलच्या बँक खात्यात परत मिळविण्यात यश मिळविले आहे. Mumbai Cyber Crime

पोलीस पथक

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar), बृहन्मुंबई शहर, देवेन भारती,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, लखमी गौतम, सह पोलीस आयुक्त, गुन्हे, शशीकुमार मीना, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे, आबुराव सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, मध्य विभाग, वरळी मुंबईचे प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग वचकल, अभिजीत गोंजारी, पोलीस हवालदार संतोष गावडे, पोलीस शिपाई शितल सावंत यांनी पार पाडली आहे. Mumbai Cyber Crime

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0