Mumbai Crime News : दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला मुलुंडमधून अटक

•घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई :- घराबाहेर पार्क केलेल्या महागड्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
वाल्मीकी मंदीराच्या बाजुला, साईनाथ किराणा शॉपच्या समोर, वाल्मीकी नगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम मुंबई येथे पार्क करुन ठेवली होती. 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्या ती चोरून पोबारा केला.याबाबत तक्रारदार यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली होती. आरोपी हा अमर नगर जीजीएस रोड मुलुंड पश्चिम येथे राहणारा असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले.त्यानुसार पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून गुरप्रीत सिंग सुखविंदर सिंग (वय 31) याला ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या तिन्ही मोटरसायकल हस्तगत करून आरोपीच्या विरुद्ध नवघर आणि मुलुंड पोलीस ठाण्यातील घरफोडी आणि गाडी चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले आहे. आरोपी हा जामीनावर बाहेर होता.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त डॉ.महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7, विजयकांत सागर, सहायक पोलीस आयुक्त, मुलुंड विभाग, संदीप मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलुंड पोलीस ठाणे अजय जोशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन खाडगे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते व पथकातील पोलीस हवालदार किरण चव्हाण, पोलीस शिपाई शेखर बावीस्कर, सुनिल विंचु, मोहन निकम, विवेक शिंपी, मनोज मोरे, राजेंद्र ठाकूर, सचिन बनसोडे यांनी केलेली आहे.