Sharad Pawar : शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक यांचे निधन, शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Tukaram Dhuwali Death : 1972 पासून शरद पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे असलेले स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे निधन
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांच्या स्वीय सहाय्यकाचे निधन झाले आहे. तब्बल 52 वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडणारे तुकाराम धुवाळी Tukaram Dhuwali यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहत दुःखद व्यक्त केले आहे. राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेले शरद पवार यांच्या 55 वर्षाच्या राजकीय वाटचालीत तब्बल 52 वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून प्रामाणिकपणे भूमिका पार पाडणारे तुकाराम धुवाळी यांनी काम केले होते.
तुकाराम धुवाळी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट म्हणाले की,मी 1972 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. आणि हि जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसंच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय.
आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो.