मुंबई

Mumbai Crime News : परदेशामध्ये गलेलठ्ठ पगार आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळी प्रमुखास गुन्हे शाखा, कक्ष-8 कडून अटक

मुंबई :- परदेशात नोकरीचे स्वप्न दाखवून भारताची आर्थिक राजधानी मुंबईमधून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा, कक्ष 8 कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. बेरोजगार तरूणांना परदेशातील गलेलठ्ठ पगार असलेल्या नोकरीचे आमिष दाखवून, त्यांना गैरकायदेशीररित्या अटकातून ठेवून व त्यांचेकडून बेकायदेशीर कामे करवून घेत असल्याबाबत तक्रारी सातत्याने समोर येत होत्या.

23 मार्च 2024 विलेपार्ले पोलीस ठाणे येथे कलम 420,370,323,342,346,347,386,504,506,34,120 (ब) भा.द.वि. सं सह कलम 10,24 इमीग्रेशन ॲक्ट 1983 हा गुन्हा गु.अ.वि., गु.प्र.शा. गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. कक्ष 8, गुन्हे शाखा यांच्याकडून तपासावर घेण्यात आला आहे.

गुन्हयाच्च्या तपासा दरम्यान सदर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीचा प्रमुख व त्याचा मुख्य साथीदार मुंबईत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. नमूद प्राप्त माहितीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर तपासाकरीता कक्ष 8, चे पोलीस पथक नमूद इसमांच्या वास्तव्याचे परिसरात रवाना करण्यात आले होते. यातील अटक आरोपी हे यंत्रणांना चकवा देण्यात वाकबगार असल्याने योग्य ती काळजी घेवून, त्यांना शिताफीने घेराव घालून परदेशात पलायन करण्याच्या आधीच अटक करण्यात गुन्हे शाखा, कक्ष 8 व्या पोलीस पथकाला यश आले.

अटक आरोपीचे नाव

1) जेरी फिलीप्स जेकब, (46 वर्षे)

2) गॉडफ्री थॉमस अल्वारेस, (39 वर्षे)

आरोपीनी संपूर्ण भारतातील विविध शहरातील गरजू तरूणांना परेदशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात त्यांना लाओस या देशामध्ये विनापरवाना प्रवेश करावयास लावून त्यांच्याकडून फसवणूकीची बेकायदेशीर कृत्ये करवून घेतली व विरोध करणाऱ्या तरूणांना बेकायदेशीर अटकाव करून भारतात परत जाण्याकरीता खंडणी घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच काही प्रकरणात बळीत तरूणांनी स्वतःची सुटका करून भारतात परतल्याचे निदर्शनास आले आहे. कक्ष -8, गुन्हे शाखा यांच्याकडून बळीत व्यक्तीची ओळख पटवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती Deven Bharti, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना Shashikumar Meena, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकुर, सहाय्यक पोलीस आयुक्त डी (प.) महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-8 चे प्रकटीकरण पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल प्रभु, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र कानडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, बनसोडे, पोलीस हवालदार यादव, किणी, काकडे, सावंत, पोलीस शिपाई रहेरे, पोलीस शिपाई सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0