क्राईम न्यूजमुंबई

Mira Road Crime News : व्यापा-याची लूट ; पाच कोटी पंधरा लाखाची लूट

Mira Road Crime News Thief Stolen 5 Crore Rs From Businessman : कक्ष-3, गुन्हे शाखेला यश ; राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकून 5.15 कोटी रोख रक्कमेची लुट करणा-या आरोपीना शिताफीने अटक

मिरा रोड :- गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटी पंधरा लाख रुपयांची रोख रक्कम त्यांचे तीन कर्मचारी 17 मार्च 2024 रोजी ह्युंदाई क्रेटा कार मधून सुरत येथून मुंबईमध्ये नेत असताना रात्री 9.00 वा. च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 च्या मुंबई च्या दिशेने जाणा-या खानिवडे टोल प्लाझा चे पुढे एका मारुती वॅगन आर कारमधून आलेल्या पाच अनोळखी आरोपींनी क्रेटा कार मध्ये बसलेले फिर्यादी व साक्षीदारय यांना पोलीस असल्याची बतावणी करुन मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये असलेल्या तीघांपैकी एकाला आरोपींनी स्वतःच्या चैगन आर कारमध्ये बसवले. तसेच कारमध्ये असलेली रोख रक्कम आणि इतर दोन साक्षीदार यांच्यासह ह्युंदाई क्रेटा कार जबरीने ताव्यामध्ये घेऊन आरोपी निघून गेले. आरोपींनी क्रेटा कारमध्ये असलेल्या दोन साक्षीदारांना मारहाण व दमदाटी करुन त्यांचे मोबाईल फोन फेकून देऊन त्यांना वेगवेगळ्या टप्यावर कारमधून उतरवले व रोख रकमेसह कार घेऊन पळून गेले. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मांडवी पोलीस ठाणे गुन्हा नोंद भा.द.वि.सं. कलम 395,363,419,420,341,170,120 (ब) अन्वये गुन्हा तपासावर आहे. Mira Road Crime News

राष्ट्रीय महामार्गावर रात्रीदरम्यान दरोडयाचा गंभीर गुन्हा असल्याने मा. वरिष्ठांच्या आदेशाने

गुन्हयाचा तपास कक्ष-3, गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तांत्रीक विश्लेषण आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे दिनांक 19 मार्च 2024 रोजी आरोपी


1) मुरगनंदन अभिमन्यु, (46 वर्षे), रा. माटुंगा, मुंबई
2) बाबु मोडा स्वामी, (48 वर्षे), रा. कांदिवली पश्चिम, मुंबई
3) मनीकंडन चलैया, (50 वर्षे), रा. भाईदर पूर्व,
4) बालाप्रभु शनमुगम, (39 वर्षे), रा. सायन, मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपी यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून, 28 मार्च 2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे. तपासादरम्यान पाहिजे आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, त्यांचा तपास सुरु आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक केली आहे.

हस्तगत मुद्देमाल

१) 4 कोटी 87 लाख 50 हजार रुपये)रोख रक्कम

२) 10 लाख रुपये किमतीची ह्युंदाई क्रेटा कार

3) 3 लाख रुपये किमतीची मारुती वैगन आर कार

4) 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन

(5 कोटी 3 लाख 15 हजार) रुपये एकुण जप्त केला आहे.

पोलीस पथक

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त , (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त साो (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, तुषार दळवी, अतिश पवार, मनोहर तारडे, प्रविण वानखेडे गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0