Mumbai Crime News : अपहरण झालेल्या मुलीचा शोध आरोपींना अटक
भांडुप पोलीस ठाणेकडुन पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस 12 तासाचे आत अटक
मुंबई :- फिर्यादी यांची लहान मुलगी वय 5 वर्षे 5 महिने हि 24 मार्च 2024 रात्री 9.30 वा. च्या सुमारास रंगपंचमी खेळण्यासाठी फुगे आणण्याकरिता बाजुच्या दुकानात गेली असता, ती परत आली नाही. फिर्यादी व त्यांचे पती यांनी मुलगी घरी आली नाही म्हणुन परिसरात शोध घेत असताना त्यांचे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने ‘तुमच्या मुलीस आपल्या परिसरात राहणारी महीला खुशबु गुप्ता उर्फ खुशी व अन्य एका अनोळखी महीला यांनी एका रिक्षात बसवून घेऊन गेल्याबाबत’ माहिती दिली. त्यावरून फिर्यादी यांनी परिसरात शोध घेवुन मुलगी मिळुन न आल्याने पोलीस ठाण्यास येवुन तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भांडुप पोलीस ठाणे भा.दं.वि कलम 363,370,34 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण व निगराणी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ संशयीत महिला नामे खुशबु गुप्ता हिंस ताब्यात घेवुन मानवीय कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता, नमुद मुलीस अपहरण करून घेवुन गेलेली महिला खुशबु गुप्ता व तिची साथीदार महिला मैना दिलोड यांनी अपहृत मुलीस चॉकलेट देण्याच्या बाहण्याने ताब्यात घेवुन रिक्षाने ठाणे परिसरात राहणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या पायल शहा व दिव्या सिंग यांचेकडे विक्री करण्यासाठी ठेवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून 1) खुशबु रामआशिष गुप्ता, (19 वर्षे), भांडुप (प), मुंबई, 2) मैना राजाराम दिलोड, (39 वर्षे), भांडुप (प), मुंबई, 2) दिव्या कैलाश सिंग, (33 वर्षे), राठी. बालकुंभ, ठाणे (प), ठाणे, 4) पायल हेमंत शहा, (32 वर्षे), बालकुंभ, ठाणे (प), ठाणे यांना ताब्यात घेवुन ठाणे येथुन अपहृत मुलीस सुरक्षितरित्या ताब्यात घेवुन तिची वैद्यकिय तपासणी करून फिर्यादीच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलेली आहे. आरोपीनां वरील गुन्हयात अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने दिनांक 28 मार्च 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन गुन्हयाचा पुढील तपास भांडुप पोलीस ठाणे करित आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, सत्यनारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त (का. व सु.), महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या आदेशाने व पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आगरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, भांडुप विभाग, मुंबई यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेकावडे, गुंडा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हवालदार वाघ, पोलीस शिपाई कचरे, कोळी, आटपाटकर, महिला पोलीस शिपाई गवळी व गरूड तसेच परिमंडळ कार्यालयातील मपोशि रूपाली हाडवळे यांनी उत्कृष्ट काम केले.