Mumbai Crime News : बेकायदेशीर बंदूक बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक
•गुन्हे कक्ष-2, मोठी कारवाई ;सातरस्ता, मुंबई यांनी जिवंत काडतुसा सह दोन अग्निशस्त्रे(बंदूक), जवळ बाळगलेल्या एका व्यक्तीला बेड्या
मुंबई :- (09 मार्च 2024) महालक्ष्मी रेल्वे स्थानक लगतच्या वरळी वरून येणारी दक्षिण वाहिनी डॉ.ई. मोसेस रोड, वरील बस स्टॉपजवळ, मुंबई या ठिकाणी एक इसम देशी बनावटीची दोन पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती. Mumbai Crime News
प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता कक्ष-2 तर्फे स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने सदर परीसरात वॉच ठेवून, सापळा लावण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम सदर ठिकाणी येताच त्यास पोलीस पथकाने शिताफिने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात दोन देशी बनावटीची पिस्टल आणि 05 जिवंत काडतुसे मिळून आली. त्यावरून राजेश खेडेकर, (21 वर्षे) याचेविरोधात ताडदेव पोलीस ठाणे वि.स्था. गु.र.क्र.९९/२०२४, कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 37(1) (अ), 135 महाराष्ट्र पोलीस कायदा सह पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे हत्यार बंदी आदेश सीपी/11 (6) (01) एल.डब्ल्यु.37 (1) (2) 2(6) 10(2) याचे उल्लंघन केले. म्हणून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. ताब्यातील आरोपी याने सदरचे पिस्टल कोणाकडून, कोठून विकत घेतले आहे आणि कोणाकरिता आणले आहे याचा तपासकरिता आहोत. Mumbai Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती Deven Bharti, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना Shashi Kumar Meena, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण, दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, पोलीस उप निरीक्षक जयेश कुलकर्णी, पोलीस उप निरीक्षक शितल पाटील पोलीस उप निरीक्षक, विजय राणे, पोलीस उप निरीक्षक संजय भावे, सहाय्यक फौजदार निंबाळकर, पोलीस हवालदार पाडवी, पोलीस शिपाई डेरे हरड, महिला पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई सपकाळ, आव्हाड, सय्यद यांनी केलेली आहे. Mumbai Crime News