
Panvel Accident News : कैलास पार्क सोसायटीचा स्लॅब पडून 7 कामगार जखमी
पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुर्नबांधणीचे काम सुरू असलेल्या कैलास पार्क सोसायटीचा 8 व्या मजल्याचा स्लॅब पडून 7 कामगार जखमी झाले असून, त्यामध्ये 2 कामगार गंभीर जखमी असल्याचे समजते.
