मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Zeeshan Siddique : एफआयआर दाखल ,धमकीनंतर झीशान सिद्दीकीची सुरक्षा वाढवली

Zeeshan Siddique Latest News : बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान म्हणाले की, "त्यांना त्यांच्या वैयक्तिक ईमेल अकाउंटवरून धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Zeeshan Siddique : एफआयआर दाखल ,धमकीनंतर झीशान सिद्दीकीची सुरक्षा वाढवली

Zeeshan Siddique Latest News : बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान म्हणाले की, "त्यांना त्यांच्या वैयक्तिक ईमेल अकाउंटवरून धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. ईमेल पाठवणाऱ्याने दावा केला आहे की बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात नाही, तर 'डी-कंपनी'चा हात आहे."

मुंबई :- माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते झीशान सिद्दीकी Zeeshan Siddique Death Threat Email यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर देखील नोंदवला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.याशिवाय, त्याच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

धमकीबाबत, झीशान सिद्दीकी यांनी दावा केला की, धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले होते की जर त्याने डी-कंपनीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला 10 कोटी रुपये दिले नाहीत तर त्याला त्याचे वडील बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणेच मारले जाईल.

एक प्रमुख नेता मानल्या जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशानची सुरक्षा वाढवण्यात आली होती, परंतु आता नवीन धमकीनंतर त्यांची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. वांद्रे पश्चिमेतील झीशानच्या घराबाहेर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.वांद्रे वेस्ट टर्नर रोडवरील इमारतीबाहेर एकूण 10 एसआरपीएफ पोलिस तैनात करण्यात आले आहेत आणि इमारतीच्या आत 8 कमांडो आणि विशेष शस्त्रांसह 6 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ही पोलिस सुरक्षा 2 शिफ्टमध्ये दिली जाईल. याशिवाय, झीशानच्या ताफ्यात दोन पोलिस व्हॅन देखील तैनात करण्यात आल्या आहेत.एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी मागण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तसंच झीशान सिद्दीकीचा जबाबही नोंदवला जाणार आहे.

शेअर करा