मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Wadettiwar : 'शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!' - कापूस-सोयाबीनच्या हमीभावासाठी महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शने

•विरोधी पक्षनेते वडेट्टीवार गळ्यात कापसाची माळ घालून विधानभवनात दाखल; 'फसवणीस सरकार' असे फलक झळकवत तातडीने कर्जमाफी आणि योग्य बाजारभावाची मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Wadettiwar : 'शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!' - कापूस-सोयाबीनच्या हमीभावासाठी महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शने

•विरोधी पक्षनेते वडेट्टीवार गळ्यात कापसाची माळ घालून विधानभवनात दाखल; 'फसवणीस सरकार' असे फलक झळकवत तातडीने कर्जमाफी आणि योग्य बाजारभावाची मागणी

नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (9 डिसेंबर) कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरत "शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधानभवनात प्रवेश केला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येत 'फसवणीस सरकार' असे स्पष्टपणे लिहिलेले निषेधाचे फलक हातात घेतले होते. याशिवाय "कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती!", "शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे!" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व आमदार सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली. ते म्हणाले की, विदर्भात अधिवेशन असूनही कापूस, सोयाबीनसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सध्या कापसाला केवळ 7 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे, तर सोयाबीनलाही भाव नाही. "कुठला हमीभाव आहे? कुठे कापसाला दर आहे?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. शेतकऱ्याला केवळ 15 क्विंटल हेक्टरी मदतीची घोषणा केली जात आहे, पण शेतकऱ्याला 10 ते 15 क्विंटल कापूस येत असेल, तर तो विकणार कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, सरकारची शेतकऱ्यांप्रती अजिबात आस्था नाही. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, महाविकास आघाडीने सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव, तात्काळ नुकसानभरपाई आणि खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत महाविकास आघाडी आपला लढा सुरू ठेवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: Baba Adhav Death : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि 'हमाल पंचायत'चे संस्थापक बाबा आढाव यांचे निधन! - 95 व्या वर्षी महाराष्ट्रातील एका 'सामाजिक पर्वाचा' अंत

शेअर करा