Vasai Kidnapping News : काळजाला पाझर फोडणारी घटना! - वसईतील 5 वर्षीय बालिकेच्या अपहरण, बलात्कार आणि खुनाचा 18 वर्षांनंतर 'नंदलाल'ला यूपीतून बेड्या
Vasai Police Latest News : 'चॉकलेट'चे आमिष दाखवून पाशवी कृत्य; मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांकडून 2007 मधील 'अनट्रेस्ड' गुन्ह्याचा यशस्वी तपास
1 मिनिट वाचन

Vasai Police Latest News : 'चॉकलेट'चे आमिष दाखवून पाशवी कृत्य; मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांकडून 2007 मधील 'अनट्रेस्ड' गुन्ह्याचा यशस्वी तपास
वसई :- मुंबईजवळील वसई परिसरात 2007 साली संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका 5 वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण, बलात्कार (Rape) आणि निघृण खुनाच्या प्रकरणातील फरार आरोपीला तब्बल 18 वर्षांनंतर मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष-2, वसईने अटक केली आहे. Vasai Latest Crime News
माणिकपूर पोलीस Manikpur Police Station स्टेशनमध्ये नोंद झालेल्या या गुन्ह्यातील आरोपी नंदलाल उर्फ नंदु रामदास विश्वकर्मा हा गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार झाला होता. 2007 साली नंदलालने पीडितेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर पाशवी कृत्य करत मारहाण केली आणि गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली होती.
मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-2, वसईने या जुन्या गुन्ह्याचा नव्याने समांतर तपास सुरू केला.तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांची चौकशी केली आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने आरोपीचे उत्तर प्रदेशातील मूळ गाव (सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील खरदौरी) शोधले.
तपास पथकाने तातडीने उत्तर प्रदेशात धाव घेतली आणि आरोपी नंदलाल विश्वकर्मा याला 10 डिसेंबर 2025 रोजी अटक करून 18 वर्षांपूर्वीच्या या पाशवी कृत्याचा हिशेब चुकता केला.




