मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Crime News : मोबाईल चोरीच्या वादातून हॉटेल चालकाची हत्या; नायगाव पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली

Vasai Latest Crime News : मालजीपाडा येथे 'यादव ढाबा'वर घडली घटना; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai Crime News : मोबाईल चोरीच्या वादातून हॉटेल चालकाची हत्या; नायगाव पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली

Vasai Latest Crime News : मालजीपाडा येथे 'यादव ढाबा'वर घडली घटना; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू

वसई :- नायगाव पूर्वेकडील मालजीपाडा येथे मोबाईल चोरीच्या किरकोळ वादातून एका हॉटेल चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Vasai Latest Crime News या प्रकरणी नायगाव पोलिसांनी Naygaon Police आठ आरोपींना अटक केली आहे. अजित यादव (वय 26) असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी मालजीपाडा येथील 'यादव ढाबा'वर सात ते आठ तरुणांचा गट जेवण करण्यासाठी आला होता. याच दरम्यान, मोबाईल चोरीच्या एका जुन्या वादावरून त्यांचा हॉटेल चालक अजित यादव यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी आरोपींनी लाकडी दांड्याने अजित यादव यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामध्ये अजित गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या विवान रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी Naygaon Police तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आठ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील सिंग (25 वय), प्रदीप यादव (23 वय), शिवम यादव (20 वय), कार्तिक साई कुनक (19 वय), सूरज पाल (21 वय), महेश यादव (22 वय) आणि राजन मौर्या (22 वय) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाईल.

शेअर करा