मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray : 'सत्याच्या महामोर्चा'पूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची 'कारणे दाखवा' नोटीस

Prakash Ambedkar On Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीनंतर आयोगाचा निर्णय; कागदपत्रे सादर न केल्याने कारवाईची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray : 'सत्याच्या महामोर्चा'पूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची 'कारणे दाखवा' नोटीस

Prakash Ambedkar On Uddhav Thackeray : प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीनंतर आयोगाचा निर्णय; कागदपत्रे सादर न केल्याने कारवाईची शक्यता

मुंबई :- महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या महामोर्चा'ची तयारी पूर्ण केली असतानाच, त्यापूर्वी एक मोठी राजकीय आणि कायदेशीर अपडेट समोर आली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

2018 मधील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी सध्या जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आयोगामार्फत सुरू आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) आयोगाने ठाकरे यांना ही नोटीस बजावली.

प्रकाश आंबेडकरांची मागणी: या प्रकरणातील साक्षीदार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोगाकडे अर्ज दाखल केला होता.

त्यांनी विनंती केली होती की, ठाकरे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सादर केलेली काही 'महत्त्वाची कागदपत्रे' आयोगासमोर आणावीत.

त्या कागदपत्रांमध्ये काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा आणि नेत्यांचा कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याचा आंबेडकरांचा दावा आहे.

दोन नोटिशींना प्रतिसाद नाही

आंबेडकर यांच्या मागणीनंतर आयोगाने उद्धव ठाकरे यांना बाजू मांडण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी 12 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबर रोजी दोनदा नोटीस बजावली होती, मात्र ठाकरे यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

जामीन वॉरंटची शक्यता

उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद न दिल्याने, आंबेडकर यांच्या वकिलांनी आयोगाकडे एक अर्ज दाखल करून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जामीन वॉरंट बजावण्याची विनंती केली होती. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने ठाकरेंना नोटीस बजावत विचारणा केली आहे की, प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जामीनपात्र वॉरंट जारी करण्याच्या विनंतीवर अंमलबजावणी का करू नये.उद्या 'सत्याचा महामोर्चा' निघण्यापूर्वी आलेल्या या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शेअर करा