मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Sex Racket : "हॉटेलच्या आड सुरु होता ऑनलाईन देहविक्रीचा धंदा; ठाण्यात दलाल अटकेत!"

Thane Sex Racket Busted By Thane Police : गुगलवर एस्कॉर्ट सर्व्हिसची जाहिरात, ग्राहकांना फोटो पाठवून महिलांची ‘डिलिव्हरी’

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nalasopara Sex Racket

Thane Sex Racket Busted By Thane Police : गुगलवर एस्कॉर्ट सर्व्हिसची जाहिरात, ग्राहकांना फोटो पाठवून महिलांची ‘डिलिव्हरी’

ठाणे | “हाय प्रोफाईल एस्कॉर्ट सर्व्हिस” या आमिषाने ऑनलाईन ग्राहकांना फसवून देहविक्री करणाऱ्या रॅकेटचा Thane Sex Racket ठाणे गुन्हे शाखेने Thane Crime Branch पर्दाफाश केला आहे. सायबर प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या या टोळीने गुगलवर जाहिरात देत मोबाईल नंबरद्वारे संपर्क ठेवत महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांची दिशाभूल केली जात होती. Thane Police Latest News

दिनांक 20 जून रोजी, ठाणे शहरातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाईचे बेत आखण्यात आले. ऑनलाइन नंबरवर संपर्क साधून एका बनावट ग्राहकामार्फत सापळा रचण्यात आला. आरोपीने ठाण्यातील "हॉटेल शिव वंदना इन लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग", वंदना सिनेमा कंपाउंड येथे महिला पाठविण्याचे कबूल केल्यावर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.

या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच, मुख्य दलालास अटक करण्यात आली असून, हॉटेल मॅनेजर आणि अन्य दोन आरोपी फरार आहेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नुसार भादंवि कलम 143(1), 143(3), 3(5) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, विनय घारेपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे, पोलीस हवालदार व्ही. आर. पाटील, आर.यु. सुवारे, के.बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार पी.जी. खरात, एच.आर. थोरात, पोलीस अंमलदार शाहु पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

शेअर करा