मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : ठाणे पोलिस आयुक्तालयात ‘एक खिडकी’ योजना

• आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सह आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police News : ठाणे पोलिस आयुक्तालयात ‘एक खिडकी’ योजना

•आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सह आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे :- शहर पोलिस आयुक्तालयात आज 7 एप्रिलपासून ‘एक खिडकी योजना’ सुरू झाली आहे. नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देऊन सुखद धक्का दिला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर चव्हाण सह पोलीस आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

राज्य सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने कृती आराखडा तयार करून जनतेचे कामे सुलभरीत्या आणि याकरिता पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून एक खिडकी योजना चालू करण्यात आली आहे.याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच होणार असल्याचे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.शस्त्र परवाना, हॉटेल, लॉज, मिरवणूक अन्य कामांसाठी जो परवाना काढावा लागतो त्यासाठी अनेक ठिकाणी हेलपाटे घालणे, अधिकारी जागेवर नसणे यामुळे परवाना म्हणजे कटकट काम अशी मानसिकता झाली होती. आता एकाच छताखाली ही सुविधा नागरिकांना मिळेल.

पोलिस आयुक्तालयात तळमजल्यावर एक खिडकी योजना कार्यालय आहे. एक सहाय्यक निरीक्षक दर्जाचा अधिकारी कर्मचारी असा ताफा आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत कामकाज होईल. अर्ज घेण्याची वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे. अर्जातील त्रुटीबाबत मार्गदर्शन, कागदपत्रे याची माहिती देणारा फलक. किती दिवसांत परवाना मिळेल याची माहिती मिळेल.

हेही वाचा: Vasai Cyber Cell : वसईत सायबर सेलच्या वतीने सायबर जनजागृती कार्यशाळा!

शेअर करा