मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : ठाणे पोलिसांच्या महिला पोलिसांकरीता "फिरते विश्रामवाहन", अत्याधुनिक सुविधांने संपन्न, पोलिसांचा अनोखा उपक्रम

Thane Police Latest News : ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून महिला पोलिसांना भेट,"महिला पोलीस विश्रामिका"वाहनाचे उद्घाटन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police News : ठाणे पोलिसांच्या महिला पोलिसांकरीता "फिरते विश्रामवाहन", अत्याधुनिक सुविधांने संपन्न, पोलिसांचा अनोखा उपक्रम

Thane Police Latest News : ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून महिला पोलिसांना भेट,"महिला पोलीस विश्रामिका"वाहनाचे उद्घाटन

ठाणे :- पोलीस विभागामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलीस देखील अहोरात्र काम करीत असतात. अनेक मोठे बंदोबस्त, महत्वाचे कार्यक्रम, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सभा, उरूस, जत्रा, सस्तंग व धार्मिक सणांचे बंदोबस्त इत्यादी कर्तव्य पार पाडत असतांना पुरुषांप्रमाणेच महिला पोलीस देखील तितक्याच खंबीरपणे उभ्या असतात. त्यासाठी तासनतास एकाच जागेवर उभे राहून त्यांना कर्तव्य पार पाडावी लागत असतात. मात्र अशावेळी नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी महिला पोलीसांना अडचणींना सामोरे जावे लागते व त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होत असतो.

ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते उद्घाटन, सेवेत दाखल

आज (19 नोव्हेंबर) रोजी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या संकल्पनेतून 'महिला पोलीस विश्रामिका' या नावाची फिरती व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. 'महिला पोलीस विश्रामिका' या उपक्रमाअंतर्गत सध्या प्रायोगिक तत्वावर एक वाहन तयार करण्यात आलेले आहे. महिला पोलीस विश्राामिका वाहनाची उपयुक्तता पाहून प्रत्येक झोनमध्ये एक विश्रामिका सुरू करण्याचा पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचा मानस आहे.विश्रामिकेची संपुर्ण डिझाईन 'सनवा मोटर्स प्रा. लि.' यांनी केलेली असून त्यासाठी एच.डी.एफ. सी. बँकेचे देखील सहकार्य प्राप्त झालेले आहे. विश्रामिकेमुळे बंदोबस्तावरील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निश्चितच फायदा होईल.

छायाचित्रे · 1/8

Arrow Keys ⟵ ⟶

वाहनाचे वैशिष्ट्य

विश्रामिका टाटा 709 या वाहनाचा वापर करून तयार करण्यात आली असून तिच्यामध्ये महिला पोलीसांना त्या कर्तव्य बजावत असतांना नैसर्गिक विधी करण्यासाठी, लहान बाळांच्या स्तनपानासाठी, कपडे चेंज करण्यासाठी तसेच काही वेळ विश्रांती करण्यासाठी एक बाथरूम, एक टॉयलेट, दोन वॉश बेसिन, दोन चेंजिंग रूम व एक सोफा कम बेड अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर विश्रामिकेवर एक महिला पोलीस चालक व एक महिला पोलीस अंमलदार पुर्णवेळ नेमण्यात आलेले आहेत.

शेअर करा