मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane News : केदारनाथ विद्यामंदिर शाळेत दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; दोन पंख्यांसह आर्थिक मदत आणि मिठाईसाठी सहकार्य!

• ठाण्यातील रामनगर येथील केदारनाथ विद्यामंदिर शाळेत श्रमिक मुक्त पत्रकार संघ आणि महाराष्ट्र मिररच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांसोबत साजरा केला दिवाळीचा आनंद.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane News : केदारनाथ विद्यामंदिर शाळेत दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; दोन पंख्यांसह आर्थिक मदत आणि मिठाईसाठी सहकार्य!

•ठाण्यातील रामनगर येथील केदारनाथ विद्यामंदिर शाळेत श्रमिक मुक्त पत्रकार संघ आणि महाराष्ट्र मिररच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांसोबत साजरा केला दिवाळीचा आनंद.

ठाणे | दिवाळीचा सण आनंद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देतो. याच भावनेतून ठाण्यातील रामनगर येथील केदारनाथ विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेला श्रमिक मुक्त पत्रकार संघ आणि महाराष्ट्र मिररच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीने शाळेला दोन पंखे भेट देण्यात आले, तसेच दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी खाऊ व मिठाई घेण्याकरिता आर्थिक मदत देण्यात आली. शाळेला आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

मान्यवर पदाधिकारी व शिक्षक वर्गाची विशेष उपस्थिती

या उपक्रमादरम्यान विविध मान्यवर आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये भाजपचे मा. चित्रपट कामगार आघाडी व कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मुंबईचे निवासी संपादक (महाराष्ट्र मिरर) विवेक जगताप, महाराष्ट्र मिररचे मुंबई ब्युरो चीफ, श्रमिक मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र लोक संवाद न्यूजचे कार्यकारी संपादक चंद्रप्रकाश मौर्या, श्रमिक मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र मिररचे प्रतिनिधी अण्णा पंडित आणि श्रमिक मुक्त पत्रकार संघार राज्य प्रवक्ते तथा महाराष्ट्र मिररचे प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांचा समावेश होता. तसेच यावेळी शाळेचे शिक्षक गिरीराज गरंडे, मनीषा ढेरे, अनमोल गोळघाटे आणि सुनील मोरे यांनी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

शैक्षणिक क्षेत्राला सहकार्य आणि सकारात्मक संदेश

शिक्षण क्षेत्राला सहकार्य करणे, शाळेच्या गरजांमध्ये हातभार लावणे आणि सणासुदीच्या काळात विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेणे ही सामाजिक बांधिलकीची महत्त्वाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सहकार्याची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते. दिवाळीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षणाप्रती आदर, सामाजिक एकोपा आणि गरजू घटकांना सहकार्य करण्याचा एक अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला असून शाळेतील वातावरण पाहून पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा: Jayant Asgaonkar : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का; काँग्रेसचे जयंत आसगावकर पराभूत, भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा

शेअर करा