मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : ठाणे पोलिसांचा 'ॲक्शन प्लॅन' तयार! 5 हजार अतिरिक्त बळाची मागणी; गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका

•ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये पोलिसांचा कडा पहारा; संवेदनशील बुथवर विशेष लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News : ठाणे पोलिसांचा 'ॲक्शन प्लॅन' तयार! 5 हजार अतिरिक्त बळाची मागणी; गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका

•ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये पोलिसांचा कडा पहारा; संवेदनशील बुथवर विशेष लक्ष

ठाणे :- आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या चार मोठ्या महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी बंदोबस्ताचा ताण लक्षात घेता, पोलिसांनी गृहविभागाकडे अतिरिक्त कुमकेची मागणी केली आहे.

अतिरिक्त 5 हजार पोलिसांची फौज

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे मनुष्यबळ सुमारे 8,500 इतके आहे. मात्र, चारही महापालिका क्षेत्रांतील भौगोलिक व्याप्ती आणि संवेदनशील केंद्र पाहता, पोलिसांना अतिरिक्त बळाची गरज आहे.

फौजफाटा: पोलिसांनी 5 हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.

होमगार्ड: यामध्ये 3 हजार गृहरक्षकांचा (Home Guards) समावेश असेल.

SRPF: मतदानाच्या दिवशी आणि निकालावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्याही तैनात केल्या जाणार आहेत.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात

सह-पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत अडथळा ठरू शकणाऱ्या समाजकंटकांविरोधात पोलिसांनी आतापासूनच मोहीम उघडली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाई: ज्यांच्यावर दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तडीपार गुन्हेगार: तडीपार घोषित केलेले गुन्हेगार शहरात आहेत का, याची तपासणी करण्यासाठी हॉटेल, लॉज आणि घरांची झाडाझडती घेतली जात आहे.

रात्रीची नाकाबंदी: शहरात ठिकठिकाणी रात्रीची नाकाबंदी वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे.

संवेदनशील बुथवर 'वॉच'

चारही महापालिका क्षेत्रांतील राजकीय पार्श्वभूमी पाहता, काही भाग 'संवेदनशील' म्हणून ओळखले जातात. या भागांतील मतदान केंद्रांची पाहणी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचे वाटप, मद्य वाटप किंवा धाकदपटशा यांसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी 'फ्लाईंग स्क्वॉड्स'ही तैनात केले आहेत.

डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह-आयुक्त, ठाणे पोलीस, यांनी,"निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लवकरच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त दाखल होईल.गुन्हेगारांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली असून, भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

हेही वाचा: Sanjay Raut : "15 हजार कोटी उडवून मिळालेला हा 'पैशांचा' विजय!"; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती आरोप

शेअर करा