मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार..'कुरिअर स्कॅम'

•सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. कुरिअर फसवणुकीमध्ये महिलेची 17 लाखांची फसवणूक

ठाणे :- सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. ठाण्यात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेची तब्बल 17 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तैवान येथे पाठवलेल्या कुरिअर मध्ये एम.डी आणि एम ए ड्रग्ज सापडले असून नार्कोटेक्स विभागात त्याविरुद्ध कम्प्लेंट केली आहे असे सांगून महिलेची फसवणूक झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (ड), 66 (क) भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कापूरबावडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या ढोकाळी परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेला एका अनोळखी व्यक्तीने कॉल करून तुम्ही तैवान देशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये एमडी आणि एमए ड्रग्ज सापडले असून तुमच्या विरोधात नार्कोटिक्स विभागात पोलीस तक्रार करण्यात आली आहे असे सांगितले. त्यानंतर एक व्यक्तीने कोटीक्स डिपार्टमेंट मधुन पोलीस बोलत असल्याचे सांगुन व्हेरिफिकेशसाठी स्काईप हे ॲप फिर्यादी यांना डाउनलोड करण्यास सांगितले. व्हिडीओ कॉल करून कायदेशीर कारवाईपासुन वाचण्यासाठी फिर्यादीस ICICI बँक खात्यातुन एकुण 17 लाख रूपये लोन घेण्यास भाग पाडले . ती सर्व रक्कम ऑनलाईन पध्दतीने आरोपीने स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास कापूरबावडी पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा: IND Vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द, बीसीसीआयने सामन्याची नवीन वेळ सांगितली

शेअर करा