मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद

ठाणे : ठाणे शहर पोलीस Thane Police आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत कासारवडवली पोलिसांनी एका तरुणाला अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹६५,६०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News : बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद

ठाणे : ठाणे शहर पोलीस Thane Police आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत कासारवडवली पोलिसांनी एका तरुणाला अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹६५,६०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Thane Latest Crime News

दिनांक १ सप्टेंबर रोजी रात्री १०:५५ वाजता नागलाबंदर सिग्नल, घोडबंदर रोड येथे सापळा लावून पोलिसांनी आरोपी जोगिंदर लछीराम राजभर (२७, राहणार कासारवडवली, मूळ गाव गाझीपूर, उत्तरप्रदेश) याला पकडले. त्याच्याकडे लाल रंगाच्या बॅगेत लपवलेले पिस्तूल व काडतुसे आढळली. शस्त्र परवाना नसल्याने त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्तांच्या सुचनांनुसार,

प्रशांत कदम, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५

मंदार जवळे, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या पथकाने केली.

कारवाईत सपोनि मनिष पोटे, पो.उ.नि. नितीन हांगे, श्रे.पो.उ.नि. सुनील सुर्यवंशी, तसेच पोलीस अंमलदार जगदीश पवार, जयसिंग राजपूत, गोरक्षनाथ काळे व संदीप तुपे सहभागी होते. पुढील तपास सपोनि मनिष पोटे करीत आहेत.

शेअर करा