मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Bribe News : लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या नावाने लाच घेणाऱ्या एजंटला 'एसीबी'चा दणका; 4,300 रुपयांच्या रकमेसह रंगेहात अटक

Thane Latest Bribe News : शासकीय शुल्क केवळ 200 रुपये असताना मागितले 5 हजार; वागळे इस्टेटमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला सापळा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Bribe News : लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या नावाने लाच घेणाऱ्या एजंटला 'एसीबी'चा दणका; 4,300 रुपयांच्या रकमेसह रंगेहात अटक

Thane Latest Bribe News : शासकीय शुल्क केवळ 200 रुपये असताना मागितले 5 हजार; वागळे इस्टेटमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला सापळा

ठाणे :- आरटीओ कार्यालयातून टू-व्हीलरचे लर्निंग लायसन्स काढून देण्याच्या बहाण्याने आरटीओ अधिकारी आणि स्वतःसाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका खाजगी एजंटला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णकुमार सत्यनारायण मिश्रा (44 वय) असे या सराईत एजंटचे नाव असून, त्याला वागळे इस्टेट येथील त्याच्या खाजगी कार्यालयात 4,300 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. शासकीय नियमांची पायमल्ली करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या या एजंटवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Crime News

या प्रकरणातील तक्रारदाराला दुचाकीचे लर्निंग लायसन्स काढायचे होते, ज्यासाठी त्यांनी 10 मार्च रोजी खाजगी एजंट कृष्णकुमार मिश्रा याच्याशी संपर्क साधला. यावेळी मिश्रा याने लायसन्स मिळवून देण्यासाठी आरटीओ अधिकारी आणि स्वतःच्या कामासाठी मिळून 5 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, सजग तक्रारदाराने याबाबत आपल्या मित्रांकडे चौकशी केली असता, लर्निंग लायसन्सचे अधिकृत शासकीय शुल्क केवळ 200 रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक होत असल्याची खात्री पटताच त्यांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला.

तक्रारीची शहनिशा करण्यासाठी एसीबीने 11 मार्च रोजी पडताळणी केली असता, मिश्रा याने 700 रुपये शासकीय शुल्क म्हणून आधीच घेतले होते आणि उर्वरित 4,300 रुपयांची रक्कम दुसऱ्या दिवशी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, 12 मार्च रोजी दुपारच्या सुमारास वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटल जवळील त्याच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 4,300 रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी मिश्राला रंगेहात पकडले. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे आरटीओच्या नावाने छुप्या पद्धतीने लाच घेणाऱ्या एजंटचे धाबे दणाणले आहेत.

शेअर करा