मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का! बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत 'शिंदे' गटात दाखल

Suhas Samant Joiend Shinde Group : "51 वर्षांची कारकीर्द शून्य केली, माझा बळी दिला!" - उपनेतेपदाचा राजीनामा देऊन सामंतांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का! बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत 'शिंदे' गटात दाखल

Suhas Samant Joiend Shinde Group : "51 वर्षांची कारकीर्द शून्य केली, माझा बळी दिला!" - उपनेतेपदाचा राजीनामा देऊन सामंतांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे निष्ठावान मानले जाणारे आणि बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी दादर येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंत यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

शिवसेनेत (ठाकरे) उपनेतेपद भूषवलेल्या सुहास सामंत यांनी अत्यंत भावनिक होऊन आपली खंत व्यक्त केली. ऑगस्ट महिन्यात बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली, ज्यात ठाकरे गटाच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर सामंत यांनी आपल्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. "बेस्टच्या पतपेढीची निवडणूक हरलो, म्हणून माझा बळी दिला. मला राजीनामा द्यायला लावला," असा थेट आरोप सामंत यांनी केला. ते म्हणाले, "मी 51 वर्षे 'मातोश्री'बरोबर प्रामाणिकपणे राहिलो आणि 31 वर्ष बेस्ट कामगार सेनेची धुरा वाहिली. निवडणूक हरलो म्हणून मला त्या पदावरून बाजूला केले." यानंतर त्यांच्या मुलाचे निधन झाले. "त्याला एक महिना व्हायच्या आतच पदावर इतरांची नेमणूक केली. माझी 51 वर्षांची कारकीर्द एका क्षणात शून्य झाली. तुम्ही महिनाभर थांबू शकला असतात. दुसऱ्यांच्या भावनांशी किती खेळायचे?" अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दादर येथील सूर्यवंशी सभागृहात झालेल्या या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी सामंत यांचे स्वागत केले आणि त्यांना उपनेतेपद बहाल केले. "बेस्ट उपक्रमाचे चाक तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू," असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

सामंत यांच्या प्रवेशामुळे मुंबईतील कामगार क्षेत्रातील ताकद शिवसेनेला (शिंदे) मिळाली असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शेअर करा