मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण कार्यकर्ते विखुरले! मुंबईत 'बंडोबा' थंड करण्याचे नेत्यांसमोर आव्हान; मनसे, शिवसेना (UBT) आणि भाजपला धक्क्यावर धक्का

Thackeray Brothers Latest News : वांद्रेत मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला घरघर; भाजपमध्येही 'नॉट रिचेबल' नेत्यांनी पुकारले बंड

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thackeray Brothers

Thackeray Brothers Latest News : वांद्रेत मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला घरघर; भाजपमध्येही 'नॉट रिचेबल' नेत्यांनी पुकारले बंड

मुंबई | मुंबई महापालिकेच्या Mumbai BMC सत्तेसाठी 'ठाकरे ब्रँड' एकवटला असला, तरी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना दिलेल्या संधीमुळे वांद्रे, चांदिवली आणि वर्सोवा या भागात राजीनामा सत्र आणि बंडाळी सुरू झाल्याने वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. Mumbai BMC Latest News

वांद्रेत मनसेला खिंडार: 11 वर्षांची साथ सुटली

'राज-उद्धव' युतीचे वारे वाहत असताना वांद्रे पूर्व भागात मनसेला मोठा हादरा बसला आहे. प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मधील मनसेच्या 11 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. गेल्या 11 वर्षे 9 महिन्यांपासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या या 'मनसैनिकांनी' अचानक साथ सोडल्याने खळबळ उडाली आहे. जागावाटपात हा भाग मित्रपक्षाला गेल्याने किंवा स्थानिक समीकरणांमुळे ही नाराजी ओढवली असल्याची चर्चा असून, वरिष्ठ आता त्यांची मनधरणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड; 'आयात' उमेदवारावरून रोष

चांदिवली मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (UBT) मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 157, 159 आणि 161 मधील तीन आक्रमक शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यावर शाखाप्रमुखांनी गंभीर आरोप केले आहेत.

नाराजीचे कारण: प्रभाग 161 मध्ये निष्ठावंत मराठी कार्यकर्त्याला डावलून, पैशाच्या जोरावर गेल्या वेळी 'एमआयएम'कडून लढलेल्या मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोप शाखाप्रमुखांनी केला आहे. उमाकांत भांगिरे, प्रशांत नलगे आणि बाळकृष्ण गटे या शाखाप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे चांदिवलीत शिवसेनेची ताकद धोक्यात आली आहे.

भाजपच्या गोटातही 'बंडाचा' झेंडा;
वर्सोवा आणि वॉर्ड 173 मध्ये टेन्शन
केवळ ठाकरे गटच नाही, तर शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपच्या डोक्यालाही बंडखोरांनी ताप दिला आहे.

वर्सोवा (वॉर्ड 60): भाजपच्या अधिकृत उमेदवार सायली कुलकर्णी यांच्या विरोधात दिव्या ढोले यांनी शड्डू ठोकला आहे. "जनतेच्या मागणीसाठी निर्णय घेण्यास धैर्य लागते," असे म्हणत त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.

वॉर्ड 173 (भावनिक आवाहन):
भाजपचे नेते दत्ता केळूसकर सध्या 'नॉट रिचेबल' असून त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. येथे शिवसेनेच्या पूजा कांबळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार असताना, केळूसकर यांनी आपल्या पत्नी शिल्पा केळूसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. "आता आर-पारची लढाई," असे म्हणत त्यांनी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

शेअर करा