मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Criminal Reels | गुन्हेगारांचे रिल्स वायरल करणाऱ्यांवर होणार 'सर्जिकल स्ट्राईक' : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गुन्हेगारांचे उदात्तीकरण पडणार महागात

M
mubarak

1 मिनिट वाचन

surgical strike on criminal reels

  • गुन्हेगारांचे उदात्तीकरण पडणार महागात
  • पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Criminal reels

    पुणे शहरात बोकाळलेली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. एका पत्रकार वार्तालापात 'ईट का जवाब पत्थर से' देण्यासाठी पुणे पोलीस सक्षम असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला. तसेच गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या Criminal Reels रिल्स वर लवकरच 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याचा सूचक इशारा अमितेश कुमार यांनी दिला.

    सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावर कोयता हल्ला, वनराज आंदेकर हत्या, हडपसर येथे फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या, गुलटेकडी येथे तरुणाचा धारदार हत्याराने खून अशा हिंसक गुन्हेगारी घटनांनी ४ दिवसात पुणे शहराला क्राईम कॅपिटल बनविले आहे. हिंसक गुन्हेगारी घटनांना रोखणे व शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अबाधित राखणे गरजेचे बनले आहे.

    गुन्हेगारी घटनांची गांभीर्यपूर्ण दखल Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली असून शहरातील गुन्हेगारांच्या कुंडल्या तपासण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. तसेच गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रिल्सवर लवकरच 'सर्जिकल स्ट्राईक' होण्याची शक्यता आहे.

    माजी पालकमंत्र्यांकडून शहरातील गुंडाला हात जोडून नमस्कार करणे पोलिसांना आवडले नाही.

    हेही वाचा: Pune Police Crime News | गांजा, एमडी विक्रेत्यांची आता खैर नाही : पुणे पोलीसांनी उघडली विशेष मोहीम : विमानतळ, बिबवेवाडी व कोंढव्यात कारवाया

    शेअर करा