मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sri Lanka win first ODI series :एकदिवसीय मालिकेत भारताला हरवून श्रीलंकेने इतिहास रचला, तब्बल 27 वर्षांनंतर घडला हा पराक्रम

Sri Lanka win first ODI series : श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sri Lanka win first ODI series :एकदिवसीय मालिकेत भारताला हरवून श्रीलंकेने इतिहास रचला, तब्बल 27 वर्षांनंतर घडला हा पराक्रम

Sri Lanka win first ODI series : श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला आहे. 27 वर्षांनंतर भारताविरुद्धची द्विपक्षीय मालिका जिंकली आहे.

BCCI :- भारताला हरवून श्रीलंकेने इतिहास रचला आहे. Sri Lanka Create history त्याने टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना 110 धावांनी जिंकला. मालिका 2-0 ने जिंकली. श्रीलंकेने तब्बल 27 वर्षांनंतर द्विपक्षीय वनडे मालिकेत भारताचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या वाईट पराभवात अनेक विक्रमही झाले. कोलंबोमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने फिरकीविरुद्ध 9 विकेट्स गमावल्या आहेत. फिरकीसमोर त्यांचे फलंदाज वाईटरित्या फ्लॉप झाले. India vs Sri Lanka Match Highlights

तिसऱ्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया 138 धावांवर गडगडली. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 35 धावा केल्या. या सामन्यात भारताला 110 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाचा दुसरा वनडे 32 धावांनी हरला होता. तर पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. अशाप्रकारे श्रीलंकेने 27 वर्षांनंतर भारताला द्विपक्षीय मालिकेत पराभूत केले. त्याने 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. India vs Sri Lanka Match Highlights

भारत-श्रीलंका मालिकेसाठी ड्युनिथ वेलालगे हा मालिका सर्वोत्तम ठरला. या मालिकेत त्याने एकूण 7 विकेट घेतल्या. मात्र वँडरसेने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 2 सामन्यात 8 विकेट घेतल्या. अविष्का फर्नांडोला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 96 धावांची खेळी खेळली. 102 चेंडूंचा सामना करताना फर्नांडोने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. India vs Sri Lanka Match Highlights

भारताकडून रोहित शर्माने 35 धावांची खेळी केली. विराट कोहली 20 धावा करून बाद झाला. रियान परागने 15 धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने 96 धावांची खेळी केली. कुसल मेंडिसने 59 धावांचे योगदान दिले. पथुम निसांकाने 45 धावांची खेळी केली. India vs Sri Lanka Match Highlights

शेअर करा