मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

धक्कादायक : भाजपा आमदार मुनिरत्नने दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अकडवले,सहा एड्स बाधित महिलांचा सहारा

BJP MLA Munirathna Trapped In Honey Trap : भाजपा आमदार मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून 'हनीट्रॅप' केले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shocking: BJP MLA Muniratna trapped two former chief ministers in honeytrap, helped six AIDS-affected women

BJP MLA Munirathna Trapped In Honey Trap : भाजपा आमदार मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून 'हनीट्रॅप' केले. त्यात आमदार, पोलिस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.सहा एड्स रुग्णांचा वापर करून दोन माजी मुख्यमंत्र्यांचा 'हनीट्रॅप'; समोर आली धक्कादायक माहिती

बंगळूर :- भाजपचे आणि माजी मंत्री आमदार मुनिरत्न BJP MLA Munirathna यांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांना 'हनीट्रॅप' Honey Trap करून मंत्रिपद मिळविल्याचा आरोप मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या पीडित महिलेने केला आहे.आमदार मुनिरत्न याने एडसची लागण झालेल्या सहा महिला रुग्णांच्या साह्याने कर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून स्वतः मंत्रिपद मिळवले होते, असा खळबळजनक आरोप मुनिरत्न यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या पीडितेने केला.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुनिरत्न याला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे.बंगळुरु येथे एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडितेने मुनिरत्न याच्यावर हा आरोप केला.मुनिरत्न याने मंत्रिपद मिळविण्यासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांना एडस् झालेल्या महिलांचा वापर करून हनीट्रॅपमध्ये अडकवले. मुनिरत्न याच्याकडे अतिशय प्रगत कॅमेरे आहेत, जे इतर कोणाकडेही नसतील. मुनिरत्न याने बड्या पोलीस अधिकाऱ्यांनाही आमच्यासारख्या असहाय्य महिलांचा वापर करून ब्लॅकमेल केले. त्यांचे अश्लिल व्हिडिओ तयार केले आहेत, असा दावा पीडितेने केला. मुनिरत्न याची ब्रेन मॅपिंग चाचणी घ्यावी,अशी मागणी तिने केली.

मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून 'हनीट्रॅप' केले. त्यात आमदार, पोलिस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. सुमारे 20 ते 30 राजकीय नेत्यांना हनीट्रॅप करून त्यांचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आल्याचे पीडितेने सांगितले.

हेही वाचा: Mumbai Weather Update : विजांचा कडकडाट, पाऊस आणि सोसाट्याचा वारा… मुंबईत ‘आपत्तीचा इशारा’, जाणून घ्या पुढील 5 दिवसांचे हवामान

शेअर करा