मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shivaji Nagar Police : शिवाजी नगर पोलिसांचा थरारक पाठलाग; 10 लाखांच्या 'एमडी'सह दोन तस्करांना बेड्या

Mumbai Shivaji Nagar Police Arrested Drug Paddlers : गोवंडी परिसरातील कारवाई; देवनार कचराभूमी जवळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dombivli's Drug Lord

Mumbai Shivaji Nagar Police Arrested Drug Paddlers : गोवंडी परिसरातील कारवाई; देवनार कचराभूमी जवळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई | शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असतानाच, शिवाजी नगर पोलिसांनी मंगळवारी रात्री गोवंडी परिसरात एका थरारक कारवाईत दोन सराईत तस्करांना अटक केली. आरोपींकडून 10 लाख रुपये किमतीचे 'एमडी' (मॅफेड्रोन) जप्त करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Mumbai Latest Crime News

संशयावरून पाठलाग आणि अटक

शिवाजी नगर पोलीस मंगळवारी रात्री गोवंडी आणि देवनार परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवनार कचराभूमी परिसरात दोन तरुण संशयास्पद रितीने वावरताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, पोलिसांना पाहून दोघांनीही पळ काढला. मात्र, पोलिसांनी जिद्दीने काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

10 लाखांचे 'एमडी' जप्त

पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे अरबाज खान (25 वय) आणि शहबाज खान (25 वय) अशी असून, दोघेही गोवंडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 'एमडी' हे अंमली पदार्थ सापडले. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आहे.

तस्करीचे जाळे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. हे दोन्ही आरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कोणाकडून घेऊन आले होते आणि ते कोणाला विकणार होते, याचा शोध आता शिवाजी नगर पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे गोवंडी परिसरातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत

शेअर करा