मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Share Marketing Fraud : "या" ॲपमधुन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून 9.73 लाखांची फसवणूक

Ullhasnagar Share Market Fraud News : गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितल्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले, ॲप डाऊनलोड केल्यानंतर बँक झाली खाली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane

Ullhasnagar Share Market Fraud News : गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो असे सांगितल्यानंतर शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले, ॲप डाऊनलोड केल्यानंतर बँक झाली खाली

उल्हासनगर :- ऑनलाईन शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करणार Ullhasnagar Share Market Fraud असाल तर सावधान रहा ! या ॲप मध्ये गुंतवणूक करून शेअर्स मार्केटमध्ये खरेदी-विक्री अथवा आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हालाही तुमचे बँकेतील पैसे गमवायला लागेल. अशीच एक घटना उल्हासनगर-3 येथे राहणाऱ्या मेडिकल दुकान असणारे एका व्यापाऱ्याबरोबर झाली आहे.Bulk Kotak Al ॲप डाऊनलोड करून यामधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तसेच शेअर्स खरेदी-विक्री केल्यास अधिकचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात Ullhasnagar Police Station दाखल करण्यात आली आहे. या फसवणुकीमध्ये मेडिकल व्यापाऱ्याला नऊ लाख 73 हजार 416 रुपये गमवावे लागले आहे. Ullhasnagar Share Market Fraud News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन अंतर्गत राजेंद्र हरिभाऊ ढमाले (43 वर्ष,) रा. शांतीनगर उल्हासनगर-3 येथे राहणाऱ्या एका मेडिकल व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये ढमाले यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप मध्ये कोटक क्लब-411 ग्रुपमध्ये ॲड करून bulk kotak al.. हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर ढमाले यांनी ॲप मध्ये एकूण नऊ लाख 73 हजार 416 रुपये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. परंतु कालांतराने त्यांना कोणत्याही प्रकारे गुंतवणूक केलेले पैशाचा मोबदला न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश सावंत करत आहे. Ullhasnagar Share Market Fraud News

हेही वाचा: Panvel Crime News : घरफोडी करणार्‍या चोरट्यास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

हेही वाचा: Bhiwandi Crime News : पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणाला बेड्या; पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त

शेअर करा