मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली; बारामतीहून तातडीने पुण्याला रवाना, रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू

•अजित पवारांच्या अकाली निधनाचा धक्का आणि धावपळीमुळे प्रकृतीवर परिणाम

V
Vivek

1 मिनिट वाचन

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले?

•अजित पवारांच्या अकाली निधनाचा धक्का आणि धावपळीमुळे प्रकृतीवर परिणाम

पुणे/बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती आज अचानक खालावल्याने त्यांना बारामतीहून तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांतील कौटुंबिक दुःख आणि शारीरिक थकव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे समजते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे.

मानसिक आणि शारीरिक ताण कारणीभूत?

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले. या धक्क्यातून शरद पवार अजूनही सावरलेले नाहीत. आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या निधनानंतरचा 'तेरावा' विधी पार पडत आहे. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते आजच्या विधीलाही उपस्थित राहू शकले नाहीत.

हेही वाचा: Sanjay Raut : "अदनान सामीसोबत नाश्ता आणि 'त्या' नटीचं कौतुक; संघाची हीच का राष्ट्रभक्ती?" संजय राऊतांचा सरसंघचालकांवर घणाघाती हल्ला

शेअर करा