मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Santosh Deshmukh Case : बीड सरपंच हत्या प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई, आतापर्यंत अनेक पिस्तुलांचे परवाने रद्द

Santosh Deshmukh Case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Santosh Deshmukh Case : बीड सरपंच हत्या प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई, आतापर्यंत अनेक पिस्तुलांचे परवाने रद्द

Santosh Deshmukh Case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आता परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू आहे.

बीड :- बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh Case यांच्या हत्येनंतर प्रशासनाकडूनही कारवाई करण्यात येत आहे. पिस्तुल गैरवापर प्रकरणाने राजकीय वेग घेतला होता. आता जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

100 पिस्तुलांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून पिस्तुलाच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पिस्तूलधारकांचे परवाने रद्द करण्यास सुरुवात झाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या किंवा न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीचा शस्त्र परवाना रद्द केला जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या रेकॉर्डची छाननी केली जात आहे. परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

शेअर करा