मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : 'साहेबां'साठी विश्रांतीला फाटा! आजारावर उपचार सुरू असतानाही संजय राऊत शिवाजी पार्कवर दाखल

Sanjay Raut At Shivaji Park : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज्यसभा खासदाराकडून 'राजकीय सक्ती'ची विश्रांती मोडली; स्मृतीस्थळी दर्शन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut : 'साहेबां'साठी विश्रांतीला फाटा! आजारावर उपचार सुरू असतानाही संजय राऊत शिवाजी पार्कवर दाखल

Sanjay Raut At Shivaji Park : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज्यसभा खासदाराकडून 'राजकीय सक्ती'ची विश्रांती मोडली; स्मृतीस्थळी दर्शन

मुंबई :- ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आणि विरोधकांना एकहाती शिंगावर घेणारे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut हे गेल्या काही दिवसांपासून सक्तीची विश्रांती घेत होते. गंभीर आजारामुळे डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

या सल्ल्यानुसार, संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबर रोजी जाहीर पत्र लिहून पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच विश्रांती घेत होते.

मात्र, सोमवार 17 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने, संजय राऊत यांनी आपल्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता विश्रांतीचा नियम मोडला. ते थेट दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

'साहेबां'वरील निस्सीम प्रेम आणि निष्ठा जपण्यासाठी संजय राऊत यांनी डॉक्टरांचा सल्ला तात्पुरता बाजूला ठेवत स्मृतीस्थळी हजेरी लावली. त्यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

स्मृतिदिनी संजय राऊत यांचे ट्विट

ज्यांच्यामुळे मी घडलो
असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना!
असा पुरुष सिंह होणे नाही!
मराठी माणसाने एकजुटीने राहावे
आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली!साहेब,जय महाराष्ट्र!

शेअर करा