मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sangali News : 'आरक्षण' वादावरून सांगलीत खळबळ! - लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी काडसिद्धेश्वर स्वामींवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा

Sangali Latest News : प्रवचनातील वक्तव्यांवरून कर्नाटकमधील फिर्यादीचा आक्षेप; 'राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल,' स्वामींचा कर्नाटक सरकारवर 'महापाप' केल्याचा गंभीर आरोप; धार्मिक-राजकीय वातावरण तापले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sangali News : 'आरक्षण' वादावरून सांगलीत खळबळ! - लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी काडसिद्धेश्वर स्वामींवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा

Sangali Latest News : प्रवचनातील वक्तव्यांवरून कर्नाटकमधील फिर्यादीचा आक्षेप; 'राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल,' स्वामींचा कर्नाटक सरकारवर 'महापाप' केल्याचा गंभीर आरोप; धार्मिक-राजकीय वातावरण तापले

सांगली :- कोल्हापूर येथील कणेरी मठाचे पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बिळूर येथील प्रवचनात लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माच्या आरक्षणावरून स्वामींनी केलेल्या वक्तव्यांवर कर्नाटकमधील एका फिर्यादीने आक्षेप घेतला आहे. Sangali Latest News

मुळत: कर्नाटकमधील बसवन पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा आता जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. स्वामींचे 9 ऑक्टोबर 2025 रोजी बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्यातील वक्तव्यांमुळे द्वेषभावना पेरली जात असून, एकोप्याला धक्का पोहोचत आहे, असे फिर्यादी शंकरगौंड बिरादार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

स्वामींचा कर्नाटक सरकारवर पलटवार

गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर स्वामींनी एबीपी माझाशी बोलताना आपली तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी कर्नाटकात लिंगायत समाज तोडणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि सरकारवर कठोर टीका केली.

स्वामी म्हणाले की, कर्नाटकात लिंगायत समाज तोडण्याचे 'महापाप' काही लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे. प्रत्यक्षपणे हिंदू धर्म तोडण्याचे काम सुरू होते, त्यामुळे तसे करू नये, असे मी बोललो. संबंधित मंत्री आणि कर्नाटक सरकारने 'कुत्सितपणे' जाऊन खोडसाळ तक्रार दाखल केली असून, हा गुन्हा केवळ राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आला आहे.

समाजाला जोडण्याचे काम करण्याऐवजी, खोडसाळपणाने राजकारण केले जात आहे, असे म्हणत स्वामींनी आपल्या प्रवचनाचा उद्देश केवळ समाज जोडणे हाच होता, असे स्पष्ट केले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात आणि कर्नाटकात धार्मिक-राजकीय वातावरण तापले आहे.

शेअर करा