मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sangali Bribe News : सांगली महापालिकेचा भ्रष्ट 'बॉस' जाळ्यात! 7 लाखांची लाच मागणाऱ्या उपायुक्तावर ACBचा घाव"

Sangali Latest Bribe News : 24 मजली टॉवरच्या परवान्यासाठी 10 लाखांची डिमांड, 7 लाखांवर तडजोड

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sangali Bribe News: Corrupt 'boss' of Sangli Municipal Corporation caught! ACB arrests Deputy Commissioner who demanded bribe of Rs 7 lakhs

Sangali Latest Bribe News : 24 मजली टॉवरच्या परवान्यासाठी 10 लाखांची डिमांड, 7 लाखांवर तडजोड

सांगली | राज्यभर लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात ACBने छेडलेल्या मोहिमेने आता सांगलीत मोठा 'हिट' केला आहे. महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप उघड झाला असून, सापळ्यात त्यांची 7 लाखांवर तडजोड झाल्याची माहिती समोर आली आहे. Sangli bribe arrest by ACB

तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार ACBपर्यंत पोहोचला आणि मग काय, सापळा रचण्यात आला. प्राथमिक चौकशीत साबळे यांची लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बातमी उघड होताच महापालिका प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

हे प्रकरण अजून थंडसुद्धा झालं नव्हतं, तोच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उपजिल्हाधिकाऱ्याने 41 लाखांच्या लाचेची मागणी करत ACBला हादरवून टाकलं होतं. त्यांच्याकडून अर्धी रक्कम आधीच घेतली गेली होती आणि उर्वरित रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरी 50 लाखांचं सोनंही सापडलं.

या घडामोडी स्पष्ट सांगतात – लाचखोरीचा सडा राज्यभर पसरलेला आहे. पण ACBचा चापट देणारा हात आता अधिकाऱ्यांच्या गळ्याशी येऊन थांबतोय!

शेअर करा