मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Samna Lekh : 'वॉशिंग मशीन'मध्ये खुनी 'स्वच्छ'! पालघर साधू हत्याकांडाच्या मुख्य आरोपीला प्रवेशावरून 'सामना'चा भाजपवर तुफान हल्लाबोल

Samna Lekh On Maharashtra Sarkar : फडणवीस-रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करा!

V
Vivek

2 मिनिट वाचन

sanjay-raut_tweet for rahul gandhi

Samna Lekh On Maharashtra Sarkar : फडणवीस-रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करा! 'खूनी, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजप हिंदुत्वाला लागलेला 'खोडकिडा' बनला'

मुंबई :- पालघरमधील गडचिंचले गावात दोन साधूंची (चिन्मयानंद स्वामी आणि स्वामी सुशीलगिरी महाराज) निर्घृण हत्या झाली होती. याच हत्याकांडातील मुख्य आरोपी काशीनाथ चौधरी याला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याच्या घटनेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र 'सामना'ने आज भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीकास्त्र सोडले आहे.

'सामना'ने म्हटले आहे की, त्यावेळी भाजप नेत्यांनी "पालघरमधील साधू हत्याकांडाने हिंदुत्वाला धक्का बसला" अशी बालिश विधाने केली होती. याच हत्याकांडातील मुख्य आरोपी काशीनाथ चौधरीला फाशी द्यावी अशी मागणी भाजपने केली होती, पण त्याच आरोपीला आता भाजपने आपल्या 'वॉशिंग मशीनमध्ये' टाकून 'स्वच्छ' केले आणि पक्षात प्रवेश दिला. "या अचाट कार्यासाठी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करायला हवा," असा उपरोधात्मक टोला 'सामना'ने लगावला आहे. भाजप खासदार हेमंत सावरा यांनी आरोपीच्या प्रवेशासाठी पायघड्या अंथरल्याचेही अग्रलेखात नमूद केले आहे.

'सामना'ने भाजपच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "भाजपची नीयत सडकी आहे," असे म्हणत या नीचपणासाठी फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणी 'सामना'ने केली आहे. "फाशीच्या गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन निर्दोष सिद्ध करायचे, हा नवा पायंडा घातक आहे." "आरोपी क्रमांक एकलाच पक्षात प्रवेश दिल्याने संपूर्ण खटलाच जमीनदोस्त होणार नाही काय?" असा थेट प्रश्न अग्रलेखाने उपस्थित केला आहे. हा प्रकार कायद्याची व सत्तेची मनमानी असल्याचे 'सामना'चे मत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून भाजपने 'ठाकरे सरकारने साधू हत्याकांड केले' असे चित्र निर्माण केले होते. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनीही या हत्येबद्दल छाती पिटण्याचा जाहीर कार्यक्रम केला होता. आता याच आरोपीला पक्षात घेतल्याने, "भाजप म्हणजे हिंदुत्वाला लागलेला 'खोडकिडा' असून पालघरचे मृत साधू भाजपला शापच देतील," अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. "हा प्रकार राजकीय स्वार्थासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचे उदाहरण आहे." सर्वत्र बोंबाबोंब झाल्यानंतर चौधरी यांच्या भाजप प्रवेशास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी, भाजपची बेअब्रू झाल्याचे 'सामना'ने म्हटले आहे.

शेअर करा