मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम यांचे मोठे वक्तव्य, 'हे रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे…'

Ram Kadam On Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम यांचे मोठे वक्तव्य, 'हे रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे…'

Ram Kadam On Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई :- अभिनेता सैफ अली खानवर Saif Ali Khan Attack झालेल्या हल्ल्याबाबत भाजप नेते राम कदम Ram Kadam यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील घरात एका हल्लेखोराने घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा सैफच्या वांद्रे येथील निवासस्थानी ही घटना घडली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. घटनेच्या वेळी अभिनेत्याच्या कुटुंबातील काही सदस्य घरात उपस्थित होते.

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सैफ अली खान चाकू हल्ल्यात जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे..

शेअर करा